Monday, March 13, 2023

हायलाइट्स: कल्याणमधून विनायक डायरे नावाचा तरुण ताब्यात डायरे कुटुंबाला शिवसेना कार्यकर्त्यांनी धमकवल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोळशेवाडी पोलीस ठाण्यात रात्री दोन वाजता ठिय्या आंदोलन

 

हायलाइट्स:

  • कल्याणमधून विनायक डायरे नावाचा तरुण ताब्यात
  • डायरे कुटुंबाला शिवसेना कार्यकर्त्यांनी धमकवल्याचा आरोप
  • उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोळशेवाडी पोलीस ठाण्यात रात्री दोन वाजता ठिय्या आंदोलन
  • कल्याण: शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणात दहिसर पोलिसांनी कल्याणच्या तिसगाव परिसरातून विनायक डायरे या तरुणाला ताब्यात घेतले आहे. विनायक डायरे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोशल मीडिया सेल कार्यकर्ता आहे. परंतु यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विनायक डायरेच्या कुटुंबीयांनी केला. नावं सांगूनही पोलीस तक्रार दाखल करुन घेत नसल्याचा दावा करत, कुटुंबीयांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. 
शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत शीतल म्हात्रे यांनी आपला व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. तसंच दहिसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात दहिसर पोलिसांनी कल्याणच्या तिसगाव परिसरातून विनायक डायरे नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं. हा तरुण ठाकरे गटाच्या सोशल मीडिया सेलचं काम पाहतो. शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी याआधीच दोन जणांना अटक केली आहे. मानस कुवर आणि अशोक मिश्रा अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत.

No comments:

Post a Comment

Free Free hashtag for Instagram like and follower

 When using hashtags on Instagram to increase likes and followers, it's important to strike a balance between popular hashtags and niche...