Tuesday, March 14, 2023

Best 5G Phones: स्वस्तात मस्त 5G Mobiles चे भन्नाट पर्याय! शेवटचा फोन तर केवळ 11 हजारांना

 Best 5G Mobile Phones Under 20000 in India: जर तुम्ही स्वस्तात मस्त 5 G स्मार्टफोनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी तीन खास पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. याच 3 स्मार्टफोनसंदर्भात सविस्तरपणे जाणून घेऊयात फिचर्स आणि किंमतीसहीतचे डिटेल्स.

Best 5G Mobile Phones Under 20000 in India: देशात 5G नेटवर्क लॉन्च झाल्यानंतर आता 5G ला सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोनची देशात चांगलीच क्रेझ दिसून येत आहे. आता भारतामध्ये 5G ची सेवा लॉन्च होऊन 5 महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच मागील वर्षी 1 ऑक्टोबर रोजी देशात पहिल्या 5G सेवेचं अनावरण केलं होतं. त्यानंतर देशात 5G फोनची मागणी वाढल्याचं दिसून येत आहे. तुम्ही सुद्धा एखादा छान 5G फोन शोधत असाल तर अगदी 20 हजारांहून कमी किंमतीमध्येही 5G फोन उपलब्ध आहेत. अशाच काही पर्यायांबद्दल जाणून घेऊयात...




वन प्लस नॉर्ड सीई 2 लाइट 5G (OnePlus Nord CE 2 Lite 5G)

भारतामध्ये वन प्लस नॉर्ड सीई 2 लाइट 5G ची किंमत 18999 रुपयांपासून सुरु होते. हा फोन 3 वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यापैकी सर्वात स्वस्त व्हेरिएंटची किंमत 20 हजारांहून कमी आहे. या फोनमध्ये 6 जीबी+128 जीबी मेमरी कॉन्फिगरेशन असेल. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरवर काम करतो. फोनमध्ये 5000 एमएएचची जबरदस्त बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 6.59 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच रेअर कॅमेरा सेटअप 64MP + 2MP + 2MP असा आहे. 

पोको एक्स फोर प्रो 5G (Poco X4 Pro 5G)

पोको एक्स फोर प्रो 5G फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून रेअर कॅमेरा सेटअप 64MP + 2MP + 2MP असा आहे. या फोनची स्क्रीन 6.67 इंचांची आहे. पोको एक्स फोर प्रो 5G स्मार्टफोनची किंमत 18999 इतकी आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आळा आहे. हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसहीत उपलब्ध आहे.


<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7081486578951220"

     crossorigin="anonymous"></script>

<!-- Daily ads -->

<ins class="adsbygoogle"

     style="display:block"

     data-ad-client="ca-pub-7081486578951220"

     data-ad-slot="8931429619"

     data-ad-format="auto"

     data-full-width-responsive="true"></ins>

<script>

     (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

</script>


लावा ब्लेझ 5G (Lava Blaze 5G)

लावा ब्लेझ 5G हा सर्वात स्वस्त फाइव्ह जी फोन आहे. या फोनची किंमत 10999 इतकी आहे. या फोनची डिझाइन फारच सुंदर असून त्याला ग्लास फिनिशिंग आहे. यामध्ये ट्रीपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मेमरी देण्यात आली आहे. या फोनची स्क्रीन 6.5 इंचांची आहे. याशिवाय या फोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन हिरव्या आणि नळ्या रंगात उपलब्ध आहे.



No comments:

Post a Comment

Free Free hashtag for Instagram like and follower

 When using hashtags on Instagram to increase likes and followers, it's important to strike a balance between popular hashtags and niche...